Join us

ऐश्वर्या राय बच्चनचं आहे दुबईत महागडं घर, किंमत वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:02 IST

अमिताभ बच्चन यांची ही सून ऐश्वर्या ही सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.

विश्वसुंदरी अर्थात ऐश्वर्या राय बच्चन फक्त दिसायलाच सुंदर तिनं आजतागायत अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. ऐश्वर्याने आपल्या अभिनयाची जादू फक्त बॉलिवूडमध्ये दाखवली नसून हॉलिवूडमध्येही तिचा जलवा पाहायला मिळतो. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक ऐश्वर्या आहे. पण तुम्हाला माहीत आहे का ऐश्वर्या किती आलिशान जीवन जगते. ऐश्वर्याचं दुबईमध्ये एक घर असून त्याची किंमत थक्क करणार आहे. 

 अमिताभ बच्चन यांची ही सून ऐश्वर्या ही सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्याचं दुबईत आलिशान घर आहे. तिचं हे घर जुमैरा गोल्फ इस्टेटमधील सँक्च्युअरी फॉल्स याठिकाणी असल्याची माहिती आहे. हा परिसर दुबईतील सर्वात पॉश आणि महागडा परिसर मानला जातो. मात्र, यावर ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबाकडून कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या घरात  अत्याधुनिक जिम, स्विमिंग पूलसह इतरही अनेक सोयीसुविधा आहे. या घराची तब्बल १५ कोटी रुपये इतकी किंमत असल्याचं बोललं जातं आहे. 

ऐश्वर्यानं पहिल्यांदाच महागडं घर खरेदी केलं नाहीये. तिच्या नावावर याआधीही अनेक महागडी घरे इतर संपत्ती आहे. सियासतने दिलेल्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चनच्या नावावर तब्बल ८०० कोटींची संपत्ती आहे. ऐश्वर्या बच्चन संपत्तीच्या बाबतीत प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, करीना कपूर, माधुरी दीक्षित यांना मागे टाकते.  ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं. त्यांना आराध्याही मुलगी आहे. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर ऐश्वर्या पोनियन सेल्व्हन 2 (PS 2) सिनेमात दिसली होती.  

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअमिताभ बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूडदुबई