Join us

Cannes 2023 : सिल्व्हर हुडीत ऐश्वर्याची कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री, Video पाहून नेटकरी म्हणाले, "धड चालताही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 09:21 IST

ऐश्वर्याची रेड कार्पेटवर एंट्री झाली आणि चाहत्यांचा हिरमोडच झाला.

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' ((Cannes Film Festival 2023) ला सुरुवात झाली आहे. अनेक कलाकारांनी रेड कार्पेटवर हजेरी लावत फॅशनचा जलवा दाखवला आहे. विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनही (Aishwarya Rai Bachchan) लेक आराध्यासोबत कान्सला पोहोचली आहे. तिच्या लुकची चाहत्यांना खूपच उत्सुकता होती. मात्र ऐश्वर्याची रेड कार्पेटवर एंट्री झाली आणि चाहत्यांचा हिरमोडच झाला. कारण ऐश्वर्याचा लुक नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या पचनी पडला नाही.

यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताकडून अनेक सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. ईशा गुप्ता, सारा अली खान, मृणाल ठाकुर, मानुषी छिल्लर, उर्वशी रौतेला यांनी रेड कार्पेटवर एंट्री केली. त्यांचा लुक खूप पसंत केला गेला. यावेळी अनुष्का शर्माही कान्समध्ये डेब्यूसाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे सर्वांना प्रतिक्षा होती ती सौंदर्यवती ऐश्वर्या रायच्या लुकची. तो क्षण आलाच जेव्हा ऐश्वर्याने रेड कार्पेटवर एंट्री केली. ब्लॅक ड्रेस आणि सिल्व्हर रंगाची मोठी हुडी तिने परिधान केली होती. यामध्ये ऐश्वर्याला चालतानाही कष्ट करावे लागत होते. तसंच ऐश्वर्याची हेअरस्टाईलही अनेकांना आवडली नाही. सध्या तिचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

ऐश्वर्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केलं आहे. 'हा काय भंगार ड्रेस घातला आहे','हिला या ड्रेसमध्ये धड चालताही येत नाहीए','ऐश्वर्याने स्टायलिस्ट बदलला पाहिजे', असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. याआधीही ऐश्वर्या तिच्या कान्स लुकमुळे ट्रोल झाली होती.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनकान्स फिल्म फेस्टिवलफॅशनट्रोल