Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mr. and Ms. शाह इंस्तांबूल टर्कीनंतर आता या ठिकाणी व्हॅकेशन करतायेत एन्जॉय, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 13:48 IST

लग्नानंतर ती नुकतीच तिचा पती प्रतीक शाहसोबत हनिमूनला इंस्तांबूल टर्कीची सफर करून आली. यानंतर ती पुन्हा एकदा फिरायला गेलीय.

अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. लग्नानंतर ती नुकतीच तिचा पती प्रतीक शाहसोबत हनिमूनला इंस्तांबूल टर्कीची सफर करून आली. यानंतर ह्रताने कामाला पुन्हा सुरुवात केली होती. आता ह्रताने पुन्हा एकदा कामातून ब्रेक घेतला आहे. 

सोशल मीडियावर ह्रताने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ह्रता सध्या पती प्रतिक शाहसोबत गोव्यामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने गोवा डायरीज असा हॅशटॅग दिला आहे. ह्रताने हा फोटो किल्ल्यात काढला आहे. ब्युटीफुल, क्युट स्माईल, नाईस पिक अशा कमेंट्स तिच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वीच हृताने प्रतिक शाहसोबत थाटात लग्न केलं. हृता, प्रतिकसोबत टर्कीमध्ये हनीमूनसाठी गेली होती. त्यावेळचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. हृताने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोला चाहत्यांकडून विशेष पसंती मिळत होती.

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांनी १८ मे रोजी लग्नगाठ बांधली. आपल्या लग्नाचा विशेष गाजावाजा न करता अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तिचे विवाह सोहळा पार पडले. तिचा जुलै महिन्यात 'अनन्या' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. फुलपाखरु, दुर्वा या मालिकांसह अनेक नाटकांमध्ये झळकलेली हृता आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. हृता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून मालिकांसह ती नाटकांमध्येही झळकली आहे. 

टॅग्स :ऋता दूर्गुळेटिव्ही कलाकार