Join us

भारतात परतल्यानंतर सोनम कपूरने प्रेग्नेंसीच्या चर्चेवर सोडले मौन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:20 IST

तब्बल १ वर्षानंतर अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच लंडनमधून भारतात परतली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच लंडनमधून भारतात परतली आहे. यावेळी तिचे वडील म्हणजेच अभिनेता अनिल कपूर आपल्या मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचले होते. त्यावेळचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत अनिल कपूरला पाहून सोनमला अश्रू अनावर झाले होते. दरम्यान सोनम कपूर लवकरच गुड न्यूज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. सोनमला शुभेच्छा द्यायला देखील सुरुवात केली होती. मात्र आता अभिनेत्रीने या चर्चांना पुर्णविराम देत एक पोस्ट शेअर केली आहे.

सोनम कपूर तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत येत असते. सोशल मिडीयावर तिच्या पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसतात. नुकतीच तिने शेअर केलेली मासिक पाळीतील दुखण्यावरील पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत सोनम मासिळ पाळीच्या पहिल्या दिवशी होणारा त्रास कमी करण्यासाठी ती काय करते याबद्दल सांगितले आहे. यामध्ये सोनम म्हणाली की, "मी गरम पाणी आणि आलं घातलेला चहा पिणे पसंत करते." 

तब्बल १ वर्षानंतर सोनम कपूर भारतात परतली आहे. कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर सोनम आपल्या घरी आली आहे. मागील वर्षी सोनम तिच्या पतीसोबत लंडनमध्ये राहत होती. तिथेच ती पतीसोबत आपला बिझनेस सांभाळत होती. 

सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे तर ती एके वर्सेस एके चित्रपटात झळकली. यात तिच्यासोबत अनिल कपूर आणि अनुराग कश्यप प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर आता क्राईम थ्रिलर ब्लाइंड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात एका अंध पोलीस अधिकाऱ्याची कथा रेखाटण्यात येणार आहे. जो सीरियल किलरचा शोध घेत असतो. यात विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :सोनम कपूरअनिल कपूर