Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर कपूरनंतर 'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरी प्रभाससोबत झळकणार? स्वत:च केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 16:14 IST

नॅशनल क्रश तृप्ती डिमरी 'बाहुबली' फेम प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार असल्याच्या चर्चा आहेत.

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित Animal सिनेमातून अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) रातोरात नॅशनल क्रश बनली आहे. सिनेमातील मुख्य अभिनेत्री रश्मिकालाही तिने साईडलाईन केले आहे. तृप्ती आणि रणबीर कपूरची केमिस्ट्री, त्यांचे इंटिमेट सीन्स चर्चेचा विषय ठरले आहेत. आता नॅशनल क्रश तृप्ती 'बाहुबली' फेम प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर स्वत: तृप्तीने स्पष्टीकरण दिलं आहे.

संदीप रेड्डी वांगा Animal नंतर आता आगामी सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. यावेळी ते प्रभाससोबत काम करणार आहेत. तृप्ती डिमरीने नुकतीच पिंकव्हिलाला मुलाखत दिली. यावेळी तिला संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी तेलुगू पॅन इंडिया प्रोजेक्ट स्पिरीटमध्ये तू आहेस का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली,'या केवळ अफवा आहेत. मी अद्याप अशा कोणत्याही प्रोजेक्टमध्ये नाहीए.'

ती पुढे म्हणाली,"मी आनंद तिवारींच्या 'मेरे महबूब मेरे सनम' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये विकी कौशलसोबत मी पहिल्यांदाच काम करणार आहे. तसंच सिनेमात पंजाबी अभिनेता अॅमी विर्कही असणार आहे. सध्या मी एवढंच सांगेन की माझे येणारे प्रत्येक प्रोजेक्ट आधीच्यापेक्षा वेगळे असतील. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हे नक्कीच सरप्राईज असेल."

सध्या तृप्ती Animal चं यश एन्जॉय करत आहे. सिनेमाच्या रिलीजनंतर तिचे इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स काही दिवसातच ३ मिलियन पर्यंत पोहोचले आहेत. तृप्तीसाठी हे यश नक्कीच खास आहे. Animal ने आतापर्यंत 600 कोटींचा बिझनेस केला आहे आणि अजूनही सिनेमाची कमाई सुरुच आहे.

टॅग्स :प्रभाससिनेमा