'पुष्पा २' चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले आहे. 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. २०२० पासून, अल्लू अर्जुनने आपला सर्व वेळ सुकुमारच्या पुष्पा: द राइज (२०२१) आणि पुष्पा 2: द रुल (२०२४) साठी समर्पित केलं होतं. इतर प्रोजेक्टला होकार देऊनही अल्लू अर्जुनने या चित्रपटांच्या पूर्णतेची वाट पाहिली कारण तो त्याचा लूक बदलू शकला नाही आणि आता अल्लू पुष्पा राजपासून पुढे जाण्यास तयार आहे.
M9 शी बोलताना, निर्माते नागा वामसी यांनी अलीकडेच अर्जुनच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी, दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवाससोबतच्या त्याच्या चौथ्या चित्रपटाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की २०२५च्या उन्हाळ्यात चित्रपट फ्लोअरवर जाण्यापूर्वी अभिनेता त्याच्या देहबोली आणि बोलीवर काम करेल. या चित्रपटाबाबत विचारले असता वामसी म्हणाले की, "आम्ही स्क्रिप्टिंग जवळपास पूर्ण केले आहे. बनी (अर्जुन) मोकळा झाल्यावर त्याची तयारी करण्यासाठी तो त्रिविक्रमला भेटेल. यासाठी त्याला त्याची देहबोली आणि तेलुगू बोलीवर काम करावे लागेल. त्यावर बरेच काम करावे लागेल आणि आम्हाला वाटते की पुढील उन्हाळ्यात चित्रपट पूर्ण होण्यास खूप वेळ लागेल आणि यासाठी आम्हाला एक खास सेट बनवावा लागेल.''
चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही पण अर्जुन आणि त्रिविक्रम यांचा हा चौथा एकत्र चित्रपट आहे. याआधी जुली (२०१२), S/O सत्यमूर्ती (२०१५) आणि अला वैकुंठपुररामुलू (२०२०) चित्रपट रिलीज झाले. या चित्रपटाची घोषणा जुलै २०२३ मध्ये करण्यात आली होती आणि गीता आर्ट्स आणि हरिका और हसीन क्रिएशन्स द्वारे निर्मिती केली होती. चित्रपटाच्या घोषणा व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "यावेळी काहीतरी मोठे" असे सांगण्यात आले होते. त्यांचे दोन्ही चित्रपट यापूर्वीही हिट झाले आहेत, त्यामुळे या प्रोजेक्टकडून खूप अपेक्षा आहेत.