Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चला हवा येऊ द्या' नंतर जिभेचे चोचले पुरवायला येतोय संकर्षण कऱ्हाडे, पण शोमध्ये असणार मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:56 IST

काही वेळ ब्रेक घेतल्यानंतर आता हा शो पुन्हा सुरू होत आहे. लवकरच 'आम्ही सारे खवय्ये' नवे एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

झी मराठीच्या काही लोकप्रिय शोमध्ये 'होम मिनिस्टर', 'चला हवा येऊ द्या', 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोची नावे येतात. 'आम्ही सारे खवय्ये' हा शोदेखील यापैकीच एक. खमंग रेसिपी दाखवणारा आणि जिभेचे चोचले पुरवणारा 'आम्ही सारे खवय्ये' हा शो गृहिणींसाठी स्पेशल आहे. काही वेळ ब्रेक घेतल्यानंतर आता हा शो पुन्हा सुरू होत आहे. लवकरच 'आम्ही सारे खवय्ये' नवे एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

'आम्ही सारे खवय्ये'मधून पुन्हा एकदा संकर्षण कऱ्हाडे प्रेक्षकांपर्यंत नवीन रेसिपी पोहोचवण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, यावेळी शोमध्ये एक खास ट्विस्ट असणार आहे. नव्या रुपात हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वाचं नाव 'आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला' असं आहे. त्यामुळे या पर्वात कदाचित नव्या जोड्या नव्या रेसिपींसह दिसण्याची शक्यता आहे. याचा नवा प्रोमोही समोर आला आहे. 

'आम्ही सारे खवय्ये'च्या या प्रोमोमध्ये संकर्षण किचनमध्ये दिसत आहे. हा नवा प्रोमो पाहून चाहत्यांची शोबद्दलची उत्सुकता वाढली आहे. या प्रोमोच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. लवकरच हा शो झी मराठीवर सुरू होत आहे. 

टॅग्स :संकर्षण कऱ्हाडेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता