Join us
Daily Top 2Weekly Top 5

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर या मराठी अभिनेत्रीचं छोट्या पडद्यावर कमबॅक, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 07:00 IST

स्टार प्रवाह एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टार प्रवाह एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  प्राईम टाईम मध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच प्रेक्षकांची दुपारही मनोरंजनाने परिपूर्ण करण्याचा स्टार प्रवाहचा प्रयत्न आहे. मुरांबा आणि लग्नाची बेडी या दोन मालिका पाहिल्याशिवाय प्रेक्षकांच्या दुपारच्या जेवणाची रंगत वाढत नाही. प्रेक्षकांची दुपार आता आणखी खास होणार आहे. कारण नव्या वर्षात म्हणजेच १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता सुरु होतेय नवी मालिका शुभविवाह. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे शुभविवाह ही मालिका. 

या मालिकेतून अभिनेत्री मधुरा देशपांडे कमबॅक करतेय. तर तिच्या सावत्र बहिणीच्या विरोधी भूमिकेत अभिनेत्री कुंजीका काळवींट झळकणार आहे. आपलं लग्न अभिजित सोबत व्हावं म्हणून ही कटकारस्थानी बहीण पूर्णिमा भूमीचं लग्न मानसिक विकलांग असलेल्या आकाशसोबत लावायला निघाली आहे. आकाशची भूमिका यशोमन आपटे साकरतोय आहे.  विशाखा सुभेदार, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल देशपांडे, शीतल शुक्ल, मनोज कोल्हटकर, विजय पटवर्धन अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे. 

या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री मधुरा देशपांडे म्हणाली, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना अतिशय आनंद होत आहे. भूमी हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. कारण भूमीसारखी इतका पराकोटीचा त्याग करणारी व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारते आहे. भूमीचे नवनवे पैलू मला दररोज उलगडत आहेत. आमची टीम खूप छान आहे. त्यामुळे शुभविवाहच्या निमित्ताने एक छान कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येईल.’

भूमीच्या सावत्र बहिणीची म्हणजेच पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळविंट म्हणाली, ‘मी गेले वर्षभर एका चांगल्या कथानकाच्या आणि चांगल्या पात्राच्या शोधात होते. शुभविवाह ही मालिका म्हणजे माझी स्वप्नपूर्ती म्हणता येईल. या मालिकेच्या निमित्ताने नव्या वर्षाची दमदार सुरुवात होणार आहे. पौर्णिमा या पात्राकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. ही भूमिका साकारताना माझा कस लागतोय असं म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही

टॅग्स :यशोमन आपटेटिव्ही कलाकार