Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य नारायणने खरेदी केला आलिशान 5 BHK फ्लॅट, पत्नी श्वेतासोबत लवकरच होणार नव्या घरात शिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 19:00 IST

१ डिसेंबरला आदित्यने त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न केले. 

गायक आणि शो होस्ट आदित्य नारायण अलीकडेचं लग्नाच्या बेडीत अडकला आहे. १ डिसेंबरला आदित्यने त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न केले.  आदित्य आणि श्वेताच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  कोरोनामुळे दित्यच्या लग्नात कुटुंबातील आणि जवळचे नातेवाईक असे 50 पाहुणेचं उपस्थित होते.

लग्नानंतर आदित्य नारायण पत्नी श्वेतासमवेत नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. आदित्यने एक आलिशान अपार्टमेंट देखील खरेदी केले आहे. आदित्य म्हणाला, 'मी अंधेरीमध्ये ५ बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट माझ्या आई वडिलांच्या  घरापासून फक्त ३ इमारती सोडून आहे. आम्ही पुढील ३-४ महिन्यांनंतर या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होऊ.'

आदित्यने सांगितले की या घरासाठी त्याने बरीच बचत करून ठेवली होती. या फ्लॅटची किंमत ४ कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. आदित्य आणि श्वेताची भेट १० वर्षांपूर्वी 'शापित' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. जेव्हा आदित्य आणि श्वेताच्या चित्रपटांमधील कारकीर्द चालली नाही तेव्हा आदित्यने छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला आणि आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. आदित्य आता सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडल होस्ट करताना दिसतोय. 

टॅग्स :आदित्य नारायण