Join us

आदित्य नारायण अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत अडकला लग्नाच्या बंधनात, समोर लग्नातील पहिला सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 19:56 IST

आदित्य अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत लग्न बंधनात अडकला आहे.

ज्येष्ठ गायिका उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण आज जुहू (मुंबई) येथील इस्कॉन मंदिरात अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत लग्न बंधनात अडकला  आहे. कोरोना व्हायरसमुळे लग्नाला कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक अशा 50 लोकांची उपस्थिती होती. उदित नारायण यांना मुलाचे लग्न थाटामाटात करायचे होते पण कोरोनामुळे तसे करता आले नाही.. पण तरीही त्यांनी आपल्या बाजूने कोणताही कसर सोडलेली नाही. उद्या 2 डिसेंबरला मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.रिसेप्शनला अमिताभ बच्चन आणि पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आले आहे.

आदित्यच्या वरातीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यात तो आपले वडील उदित नारायण यांच्यासह नाचताना दिसत आहे. आदित्यची आई दीपा नारायणने याही मुलाच्या वरातीत डान्स करताना दिसल्या. 

सोशल मीडियावर केली होती लग्नाची घोषणा3 नोव्हेंबरला आदित्य नारायणने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची घोषणा केली होती. आदित्य नारायणने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले. ''आम्ही लग्न करणार आहोत! मी खूप भाग्यवान आहे की 11 वर्षांपूर्वी मला माझी सोबती श्वेता भेटली. आम्ही डिसेंबरमध्ये लग्न करणार आहोत.'

श्वेताने करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली आहे. श्वेता 2000 मध्ये टीव्ही सीरियल 'बाबुल की दुल्हनिया' मध्ये दिसली होती.यानंतर श्वेता 2001 मध्ये 'शगुन' आणि 2004 मध्ये 'देखा मगर प्यार से' मध्ये दिसली होती. श्वेताने साऊथ फिल्म इंडस्ट्रीबरोबर फिल्मी जगात पाऊल ठेवले. श्वेता शेवटची 2010मध्ये आलेला बॉलिवूड सिनेमा शापितमध्ये आदित्य नारायणसोबत शेवटची दिसली होती. हा एक हॉरर सिनेमा होता. 

टॅग्स :आदित्य नारायण