Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठीमध्ये डबल एविक्शन! योगिता चव्हाण गेली घराबाहेर, सर्वांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 22:18 IST

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये निखिल दामलेनंतर आज योगिता चव्हाण घराबाहेर गेली आहे (yogita chavan, bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज डबल एविक्शन झालं. यापैकी सुरुवातीला निखिल दामलेला घराबाहेर जावं लागलं. आता नुकतंच योगिता चव्हाणचा बिग बॉस मराठीमधील प्रवास संपला आहे. योगिताचं बिग बॉस मराठीमध्ये एविक्शन झाल्याने सर्वांना धक्का बसलाय. योगितासोबत सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत डेंजर झोनमध्ये होते. यापैकी योगिताला घराबाहेर जावं लागलं आहे.

योगिता चव्हाण बिग बॉस मराठीमधून बाहेर

आज भाऊच्या धक्क्यावर सुरुवातीलाच रितेश देशमुखने घरात डबल एविक्शन होणार असल्याचं जाहीर केलं होतं. या आठवड्यात अभिजीत, निखिल, योगिता आणि सूरज हे चौघेजण नॉमिनेट होते. यापैकी सुरुवातीलाच निखिलचं एविक्शन झालं. निखिलचं एविक्शन झाल्यावर योगिता घराबाहेर जाण्याचं रितेश देशमुखने अनाऊन्स केलं. योगिता घराबाहेर गेल्याची घोषणा होताच सर्वांना धक्का बसला. 

योगिता चव्हाणचा बिग बॉसमधील प्रवास

योगिता चव्हाणने जान्हवी किल्लेकरसोबत बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री केली होती. योगिता सुरुवातीच्या आठवड्यात घरात शांत होती. इतकंच नव्हे योगिताने दुसऱ्या आठवड्यात दोनवेळा बिग बॉसकडे तिला घराबाहेर जायचंय, तिला घरात मानसिक त्रास होतोय असं सांगितलं. परंतु या आठवड्यात शांत असलेल्या योगिताने कॅप्टनसी कार्यात चांगला खेळ दाखवला. यामुळे रितेशने भाऊच्या धक्क्यावर योगिताचं चांगलं कौतुक केलं. परंतु दुर्दैवाने आज योगिताचा बिग बॉस मराठीमधला प्रवास संपला आहे. योगिता घराबाहेर गेल्याने सर्वांनाच दुःख झालेलं दिसलं.

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीरितेश देशमुख