Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा काजोलच्या आईने धर्मेंद्र यांच्या कानाखाली लगावली, जाणून घ्या काय होता तो किस्सा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 15:23 IST

होय तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हा किस्सा घडला आहे.

Tanuja slapped Dharmendra : बॉलिवूडचे सर्वात हँडमस अभिनेते म्हणून ओळख असलेले धर्मेंद्र (Dharmendra) आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसणार आहेत. धर्मेंद्र यांनी ७० ते ८० चा काळ गाजवला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले. धर्मेंद्र अभिनेते म्हणून तर हिट होतेच पण खऱ्या आयुष्यातही अतिशय जॉली होते. पण त्यांचा हाच स्वभाव एकदा त्यांना अडचणीत टाकणारा होता. काजोलची आई अभिनेत्री तनुजाने एकदा धर्मेंद्र यांना कानाखाली मारले होते.

होय तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हा किस्सा घडला आहे. स्वत: तनुजा यांनी हा किस्सा सांगितला असून धर्मेंद्र यांनी त्यांच्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार घडला होता. 'चॉंद और सूरज' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हे घडलं होतं. तेव्हा तनुजा धर्मेंद्र यांच्या पत्नीसोबत पार्टी करत होत्या. 

धर्मेंद्र यांनी नेमकं काय केलं?

तनुजा म्हणाल्या, 'धर्मेंद्र यांनी माझ्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. मी शॉक होऊन त्यांना निर्लज्ज असं म्हणलं होतं. इतकंच नाही तर मी त्यांच्या कानाखालीही मारलं. मी त्यांची पत्नी प्रकाश कौरला ओळखत होते. तरी धर्मेंद्र यांनी असा प्रयत्न केला. नंतर त्यांना आपल्या वागण्यावर पश्चात्ताप झाला. ते मला तनु, मेरी मॉं, सॉरी. प्लीज मला तुझा भाऊ बनव असं म्हणाले. यानंतर मी एक काळा धागा त्यांच्या हातावर बांधला होता.'

या घटनेवेळी धर्मेंद्र यांच्या आयुष्यात हेमा मालिनी यांची एंट्री झाली नव्हती. धर्मेंद्र आणि तनुजा यांनी 'चॉंद और सूरज','मोहब्बत की कसम','बहारे फिर भी आएंगी', 'दो चोर और इज्जत' यांसारख्या सिनेमात काम केले आहे. त्यांची केमिस्ट्रीही हिट झाली होती. मात्र नंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची रिल आणि रिअल लाईफ जोडी सुपरहिट झाली.

टॅग्स :धमेंद्रकाजोलबॉलिवूड