Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बूला मिळाला हा मोठा सिनेमा, या खानसोबत पुन्हा रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 12:52 IST

आता या सिनेमात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. 

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या आगामी सिनेमा 'भारत' बाबत काही नवीन अपडेट्स आले आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमात सुनील ग्रोव्हर आणि दिशा पटानी यांची एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली होती. आता या सिनेमात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानची खास मैत्रिण अभिनेत्री तब्बू सुद्धा 'भारत' या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. मात्र, तब्बू सिनेमात काय भूमिका करणार याचा अजून खुलासा झाला नाहीये. 

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सांगितले की, "मी तब्बूच्या कामाचा खूप मोठा फॅन आहे. आणि नेहमीच तिच्यासोबत मला काम करण्याची इच्छा होती. मला आनंद आहे की, तिच्यासोबत अनेक मिटींग केल्यानंतर आता ती 'भारत' सिनेमात करत आहे. मला शूटिंगची उत्सुकता लागली आहे".

याआधी सलमान खान आणि तब्बू ने पहिल्यांदा 1996 मध्ये 'जीत' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी 'बीवी नं. 1' या सिनेमात, 'हम साथ साथ है', 'जय हो' या सिनेमात एकत्र दिसले होते.

टॅग्स :तब्बूबॉलिवूड