अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty( यांनी एकेकाळी सिनेइंडस्ट्री गाजवली होती. 'डिस्को डान्सर' म्हणून त्यांना ओळख मिळाली होती. १९७६ साली मिथुन चक्रवर्ती यांनी 'मृगया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मिथुन चक्रवर्ती गेली ४९ वर्ष निरनिराळ्या भूमिकांमधून बॉलिवूड गाजवत आहेत. एका सिनेमात त्यांनी २५ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन दिले होते. मात्र चालू सीनमध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप अभिनेत्रीने लावला होता. नेमकं काय घडलं होतं?
२००६ साली आलेला हा सिनेमा होता 'चिंगारी'. या सिनेमावेळी मिथुन चक्रवर्ती आणि सिनेमाची मुख्य अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्यात मोठा वाद झाला होता. इंटिमेट सीन करताना सुष्मिताने मिथुन यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप लावला होता. इतकंच नाही तर ती सेट सोडून निघूनही गेली होती. दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांनीही नंतर सुष्मिता आणि मिथुन यांच्यात तणाव निर्माण झाल्याचं मान्य केलं होतं. सुष्मिता शूटिंग सोडून मध्येच निघून गेली होती. तिला त्या इंटिमेट सीनमुळे खूप अनकंफर्टेबल वाटत होतं. तिने कल्पना यांच्याकडे मिथुन यांच्याबाबत तक्रारही केली. मात्र कल्पना यांनी सुष्मिताला हा फक्त एक गैरसमज आहे असं समजावलं होतं. नंतर सुष्मितालाही ती जास्तच रिअॅक्ट होत असल्याची जाणीव झाली. तिने मिथुन यांच्यासोबत संवाद साधला आणि हे प्रकरण मिटवलं.
सिनेमा रिलीज झाल्यानंतर एका मुलाखतीत सुष्मिता म्हणालेली की या सिनेमाचा तिच्यावर दीर्घकाळ परिणाम झाला आहे. सुष्मिताने सिनेमात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. सिनेमात काम करताना मिथुन चक्रवर्ती ५५ वर्षांचे होते. तर सुष्मिता ३० वर्षांची होती. दोघांच्या वयात २५ वर्षांचं अंतर होतं.