Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री श्रीलीलाने गाठलं शिर्डी, साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:10 IST

अभिनेत्री श्रीलीलाने आपल्या आईसह शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावली.

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) तिच्या अभिनयासह, निखळ सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे. 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं 'पुष्पा २' चित्रपटातील 'किसिक' (KissIk) हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. तिच्या नृत्याचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. नुकतंच श्रीलीलानं शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावत दर्शन घेतले. यावेळी श्रीलीलासोबत आई स्वर्णलता यादेखील उपस्थित होत्या. 

साई दर्शनानंतर संस्थानच्यावतीनं श्रीलीला हिचा शाल आणि साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी साईबाबांच्या द्वारकामाई आणि गुरुस्थान मंदिरातही जाऊन श्रीलीला हिनं मनोभावे दर्शन घेतलं आहे.  तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी आणि भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.

साईदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्रीलीला म्हणाली, "आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन खूप समाधान वाटलं. मी लहानपणापासून आईबरोबर शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहे. मात्र, आज सहा वर्षांनंतर साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचा योग आला आहे. आज दर्शन घेऊन आनंद झाला".

श्रीलीलाच्या कामाबद्दल बोलायचं झालं 'आशिकी ३' चित्रपटात श्रीलीला कार्तिक आर्यनबरोबर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या श्रीलीलाचं नाव कार्तिक आर्यनबरोबर जोडलं जात आहे. दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडशिर्डीसाईबाबा