Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीपासून का दूर गेली श्वेता तिवारी? म्हणाली, "मालिका पाहणंच आता सोडलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 15:07 IST

श्वेता बऱ्याच दिवसांपासून मालिकांमध्ये दिसली नाही याचं कारण तिने नुकतंच सांगितलं.

अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari)  छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरला सुरुवात केली. 'कसौटी जिंदगी की' ही तिची मालिका तूफान गाजली. यानंतर अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं. श्वेताचं वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं. दोन वेळा तिचा घटस्फोट झाला आणि दोन्ही वेळी तिला नवऱ्याकडून घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. श्वेताला पहिल्या नवऱ्यापासून पलक ही २३ वर्षांची मुलगी आहे तर दुसऱ्या नवऱ्यापासून तिला 8 वर्षांचा मुलगा आहे. सर्व संकटातूनही श्वेताने एकटीने मुलांचा सांभाळ केला. आज ती 'संतूर मॉम' म्हणून ओळखली जाते. श्वेता बऱ्याच दिवसांपासून मालिकांमध्ये दिसली नाही याचं कारण तिने नुकतंच सांगितलं.

श्वेता तिवारी सध्या मालिका नाही तर वेबसीरिजमध्ये काम करत आहे. तसंच लवकरच ती परितोष पेंटर यांच्या 'एक मै और एक दो' नाटकात दिसणार आहे. याचा पहिला प्रयोग 6 जुलै रोजी मुंबईत होणार आहे. 'टेली टॉक'ला दिलेल्या मुलाखतीत श्वेता म्हणाली, "मी एकच काम सतत करु शकत नाही. टेलिव्हिजन आपल्याच कॉन्टेंटला रिपीट करत आहे. मी तर आता मालिका पाहणं सुद्धा सोडलं आहे. असे खूप कमी शोज आहेत जे पाहण्याची इच्छा होते. मला कळतच नाही की टीव्ही पुढे का जात नाही आणि काहीतरी वेगळं का करत नाही. तिथे करायला खरं तर बरंच काही आहे."

यासोबतच ती म्हणाली, "मी सलग ३० दिवस शूट करु शकत नाही. कारण मला माजझ्या मुलांनाही वेळ द्यायचा असतो. मी कमी पैशात शो करणार नाही आणि प्रोडक्शन वाल्यांना ३० दिवसांचे काम करुन घ्यायचे असते. आधी ३० दिवस काम करायला काही वाटायचं नाही पण आता ते शक्य नाही. २० दिवसांचं काम द्या पण मला रविवार ऑफ पाहिजे म्हणजे मुलांसोबत वेळ घालवता येईल."

टॅग्स :श्वेता तिवारीटेलिव्हिजन