Join us

घटस्फोट कॅन्सल? 'या' मराठी अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय, लेकीचा विचार करुन उचललं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 16:10 IST

घटस्फोटापर्यंत आलेल्या मराठी अभिनेत्रीने आता निर्णय मागे घेतला आहे.

मनोरंजनविश्वात सध्या जसे लग्नाचे वारे वाहत आहेत तसंच घटस्फोटांनाही ऊत आलाय. नुकतंच अभिनेत्री ईशा कोप्पिकरचा 14 वर्षांचा संसार मोडल्याची बातमी पसरली. शिवाय बॉलिवूडमध्ये अलीकडच्या काळात अनेक घटस्फोट झाले आहेत. पण याउलट आता वेगळीच बातमी आहे. घटस्फोटापर्यंत आलेल्या मराठी अभिनेत्रीने आता निर्णय मागे घेतला आहे. लेकीला यामध्ये ओढायला नको म्हणून पती पत्नीने हा निर्णय घेतला आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

'भाभीजी घर पर है' फेम अंगुरी भाभी म्हणजेच मराठी अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre)  पतीपासून वेगळी होत असल्याची चर्चा होती. २००३ साली तिने पियूषसोबत लग्न केले होते. पियूष डिजीटल मार्केटिंगमध्ये आहे. तसंच त्यांना १९ वर्षांची लेकही आहे. आपापसातील मतभेदामुळे शुभांगी पतीपासून वेगळी झाली. शिवाय ते घटस्फोट घेणार या चर्चाही सुरु झाल्या. मात्र लेकीसाठी त्यांनी घटस्फोट न घेण्याचं ठरवलं आहे. शुभांगी फक्त वेगळी राहणार आहे मात्र कपल घटस्फोट घेणार नाही असा त्यांनी निर्णय घेतला आहे. 

हिंदुस्तान टाईम्स रिपोर्टनुसार, शुभांगी आणि पियुष वेगळे झाले आहेत. आपापल्या आयुष्यात ते पुढे जात आहेत. मात्र जेव्हा कायदेशीर गोष्टी येतात तेव्हा दोघंही मागे येतात. कारण त्यांना आपल्या मुलीला यामध्ये ओढायचं नाही. घटस्फोट न घेता त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.'

शुभांगी अत्रेने 'चिडिया घर','कस्तुरी' आणि 'भाभीजी घर पर है' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 'भाभीजी घर पर है' मधील  अंगुरी भाभी ही तिची भूमिका खूप गाजली. शिवाय तिने पूर्वी 'कसौटी जिंदगी की' मालिकेतही काम केले आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारघटस्फोटपरिवार