Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अप्पी आमची कलेक्टर'मधील अप्पीची भूमिका साकारणारी शिवानी म्हणते, अनेक अडचणींवर मात करून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:07 IST

प्रोमो रिलीज होताच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सध्या सोशल मीडियावर अप्पीची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे.

झी मराठी वर अप्पी आमची कलेक्टर या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) ह्या मध्यवर्ती भूमिकेतून नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे. शिवानीने याआधी अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. 

ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन मिळत नाही.पण तिचं ध्येय खूप मोठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि  सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे. प्रोमो पाहून चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांच्या वज्र प्रॉडक्शन निर्मित असलेल्या या मालिकेत एक नवा विषय, एक नवी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, " मी खूप भाग्यवान आहे की मला झी मराठीच्या मंचावर काम करण्याची संधी मिळतेय. एक नवीन जबरदस्त प्रेरणा असणारी एक मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करणा-या मुलीची भूमिका मला करायला मिळणार आहे. मी खूप खुश आहे कारण मी एका महत्त्वकांक्षा असणाऱ्या मुलीची भूमिका करणार आहे आणि ही अप्पी प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी