बॉलिवूडमध्ये एकेकाळी आघाडीवर असलेली अभिनेत्री शीबा आकाशदीप (Sheeba Akashdeep) सध्या तिच्या मुलाखतींमुळे चर्चेत आहे. शीबाने सलमान खान, अक्षय कुमार, सैफ अली खान यासह काही अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने सलमानसोबत (Salman Khan) काम करण्याचा अनुभव सांगितला. तसंच सलमान त्यावेळी सेटवर गर्लफ्रेंडला घेऊन यायचा असाही खुलासा तिने केला. तिने सलमानच्या डेटिंग लाईफ आणि गर्लफ्रेंडसोबतच्या वर्तवणुकीबद्दल अनेक खुलासे केले.
शीबा आणि सलमान खान १९९२ मध्ये आलेल्या 'सूर्यवंशी' सिनेमात एकत्र दिसले होते. याच सिनेमाच्या शूटिंगवेळी सेटवर सलमानची गर्लफ्रेंड यायची. 'स्क्रीन'ला दिलेल्या मुलाखतीत शीबा म्हणाली,"सलमान त्यावेळी अगदीच नवखा होता. मीही इंडस्ट्रीत नवी होते आणि तोही. तो खूप चांगला, मनमिळाऊ, दयाळ होता. सर्वांची काळजी घ्यायचा. तो फिल्मी बॅकग्राऊंडमधून आला होता पण मी आऊटसाइडर होते. मी या शहरातही नवी होते. त्यामुळे तो माझ्याबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह असायचा आणि खूपच चांगला को स्टार होता."
कुत्र्यामुळे मैत्रीच तुटली! सैफ-अमृताची मैत्रीण शीबा आकाशदीपचा खुलासा; नक्की काय घडलं?
सलमान गर्लफ्रेंडसोबत कसा राहायचा? यावर ती म्हणाली,"कोणत्याही सामान्य मुलाप्रमाणेच तोही प्रेमात होता. सेटवर त्याची गर्लफ्रेंड यायची. जेव्हा मी घरी जायचे तेव्हाच तीही निघायची. एक सामान्य बॉयफ्रेंड ज्याचं आपल्या गर्लफ्रेंडवर प्रेम होतं असाच तो होता. प्रत्येकजण आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रेमात पडतो. बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड असणं काही मोठी गोष्ट नव्हती."