Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजाराहाट म्हणत मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे थेट पोहोचली भाजी मार्केटमध्ये, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 16:28 IST

प्रिया मराठे(Priya marathe ) हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रिया मराठे(Priya marathe ) हे नाव घराघरात पोहोचले आहे. प्रियाने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे.  प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केलं.

अभिनेत्री प्रिया मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. नुकताच प्रियाने एका व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियाने भाजी आणि फळ मार्केटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. बाजाराहाट, अशी एक जाग जी मला आणि माझ्या आईला खूप आवडते..ती म्हणजे भाजी आणि फळ मार्केट, असं कॅप्शन प्रियाने या व्हिडीओला दिलं आहे. प्रिया आईसोबत नारळ पाण्याचा आस्वाद देखील घेतला आहे. बाजारातून प्रियानं  बाजरातून  सिमला मिरची,काकडी, संत्री, केळी आणि टोमॅटो घेतले आहेत. प्रियाच्या या व्हिडीओ चाहते जोरदार कमेंट करताना दिसतायेत. 

प्रिया अलीकडेच  येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत दिसली होती. तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली.याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली. तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती.

टॅग्स :प्रिया मराठेटिव्ही कलाकार