Join us

अभिनेत्री प्रीतम कागणे 'झोलझाल'मध्ये झळकतेय अंजूच्या भूमिकेत, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:49 IST

अभिनेत्री प्रीतम कागणेच्या अभिनयाची वाटचाल दक्षिणात्य चित्रपटातून झालीय.त्यानंतर तिने आपला मोर्चा मराठी सिनेसृष्टीकडे वळवला.

अभिनेत्री प्रीतम कागणेच्या अभिनयाची वाटचाल दक्षिणात्य चित्रपटातून झालीय. मिस्टर बिन या मल्याळम प्रमुख भूमिका तिने साकारली होती. त्यानंतर तिने आपला मोर्चा मराठी सिनेसृष्टीकडे वळवला. नवरा माझा भोवरा, हलाल, अहिल्या, वाजवूया बँड बाजा यासारख्या सिनेमांमध्ये तिने काम केलंय. मराठी, मल्याळम आणि हिंदी या तिनही भाषांमध्ये तिने काम केलंय. नुकत्याच रिलीज झालेल्या मराठी सिनेमात प्रीतम झळकली आहे. 

अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत 'युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन' अंर्तगत बनलेल्या 'झोलझाल' चित्रपट प्रीतमने अंजू पाटेकरची भूमिका साकरली आहे. झोलझाल या चित्रपटात तब्बल २२ कलाकारांनी काम केले आहे. एका महालाभोवती चित्रपटाची कथा फिरते. तो महल मिळवण्यासाठी कोण काय काय आणि कसे झोलझाल करतात, हे चित्रपट पाहिल्यावर कळेल.

दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून निर्मित निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी उत्तमरित्या पेलली आहे.

टॅग्स :सिनेमाकुशल बद्रिके