Join us

"हीच्यामुळे मी अजून लग्न केलं नाही..", प्राजक्ता माळीच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 08:00 IST

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने इन्स्टाग्राम काऊंटवर काही फोटो शेअर केलेत आणि ते फोटो पाहून चाहते जणू तिच्या प्रेमात पडले

Prajakta Mali : तरूणांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होता. प्राजूने एखादी पोस्ट केली रे केली की ती क्षणात व्हायरल होते. प्राजक्ता सोशल मीडियावर रोज नवे फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत आणि ते फोटो पाहून चाहते जणू तिच्या प्रेमात पडले. 

प्राजक्ताने हिरव्या रंगाच्या ड्रेसमधले तीन फोटो शेअर केलं आहेत. तो बात बन जाए…हां हां बात बन जाए…असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते फिदा झालेत. एकाहून एक भन्नाट कमेंट तिच्या या फोटोंवर येतात. हीच्यामुळे मी अजून लग्न केलं नाही, एकदम भारी दिसत आहे तु कातील अदा आहे तुझी, सई च मार्केट घालवल, बात बन ही गयी अशा कमेंट्स चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर केल्या आहेत.  

प्राजक्ताच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचं झालं तर प्राजक्ताने नुकतेच एका आगामी मराठी चित्रपटाचं शूटिंग केले आहे. त्यासाठी ती लंडनला गेली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटी