Join us

अभिनेत्री पूजा बत्रा दिसली गोव्याच्या समुद्रात एन्जॉय करताना, फोटो बघून फॅन्स झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 14:56 IST

अभिनेत्री पूजा बत्राने 1993 साली मिस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

अभिनेत्री पूजा बत्राने बॉलिवूडपासून दूर गेली असली तरी ती बर्‍याचदा त्याच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. पूजा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि तिचे फोटो ती पोस्ट करत असते. पूजा बत्रा तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

सध्या पूजा गोव्यामध्ये एन्जॉय करते आहे. इन्स्टाग्रामवर तिने तिचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच हॉट दिसते आहे. पूजाचे फॅन्स तिच्या या फोटोंवर जोरदार कमेंट्स करतायेत. 

अभिनेत्री पूजा बत्राने 1993 साली मिस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर 1997 साली 'विश्वविधाता' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  त्यानंतर विरासत, भाई, हसीना मान जायेगी, कहीं प्यार ना हो जाये, नायक यासारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली होती.  लग्नानंतर पूजा बॉलिवूडपासून लांब गेली आणि संसारात रमली. मात्र या दोघांचे लग्न फार काळ काही टिकले नाही. अखेर 2011 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले.  वयाच्या ४२ व्या वर्षी अभिनेता नवाब शाहसह पूजाने लग्न केलं .पूजाचं हे दुसरं लग्न आहे. 

टॅग्स :पूजा बत्रा