Join us
Daily Top 2Weekly Top 5

४ वर्षांनी चुडैल बनून परतणार निया शर्मा, नव्या मालिकेचा प्रोमो एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 16:42 IST

निया शर्माची नवी मालिका 'सुहागन चुडैल', प्रोमो पाहून झोप उडेल

निया शर्मा म्हणजे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा. 'एक हजारों में मेरी बहना हैं', 'इश्क में मरजावां', 'जमाई राजा' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून निया घराघरात पोहोचली. पण, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच निया छोट्या पडद्यापासून दूर गेली होती. गेली काही वर्ष ती कुठेच दिसली नाही. आता पुन्हा ४ वर्षांनी निया नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'सुहागन चुडैल' असं नियाच्या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत निया नवी भूमिका साकारताना दिसणार आहे. चुडैल बनून निया ४ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक करत आहे. तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सुहागन चुडैल' या मालिकेच्या प्रोमोमध्ये नियाची झलक पाहायला मिळत आहे. ही हॉरर मालिका कलर्स वाहिनीवर लवकरच सुरू होणार आहे. 

'सुहागन चुडैल' या मालिकेत नियाबरोबर अभिनेता जैन इबाद खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. निया २०२२ मध्ये 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. पण, मालिकांमधून मात्र ती गायब होती. आता ४ वर्षांनी ती पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

टॅग्स :निया शर्माटिव्ही कलाकारसेलिब्रिटी