Join us

रणबीर कपूरच्या 'रामायण' मधून 'या' अभिनेत्रीचा पत्ता कट; म्हणाली, "आता कोणाला घेणार..."

By ऋचा वझे | Updated: March 4, 2025 09:52 IST

माझ्या नाकामुळे मी या भूमिकेसाठी परफेक्ट होते पण...

रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor)  'रामायण' (Ramayan) सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. नितेश तिवारी सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. रणबीर-साईची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तसंच सिनेमातील इतर स्टारकास्टही तगडी असणार आहे. दरम्यान नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सिनेमातून एका अभिनेत्रीचा पत्ता कट झाला आहे.

कोण आहे ती अभिनेत्री?

'रामायण' सिनेमाच्या शूटिंगचं पहिलं शेड्युल पूर्ण झालेलं असतानाच आता एका अभिनेत्रीला सिनेमातून आऊट करण्यात आलं आहे. 'शूर्पणखा'च्या भूमिकेसाठी अभिनेत्री कुब्रा सैतने (Kubra Sait) ऑडिशन दिली होती.  मात्र नुकतंच बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत कुब्रा म्हणाली, "माझ्या नाकामुळे मी या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट होते. यासाठी मी योग्य होते पण मला कास्ट करण्यात आलं नाही. आता त्यांनी या भूमिकेसाठी कोणाची निवड केली आहे हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे."

कुब्रा सैत 'सेक्रेड गेम्स' वेबसीरिजमुळे ओटीटीविश्वात प्रसिद्ध आहे. ती काजोलच्या 'द ट्रायल' या सीरिजमध्येही दिसली होती. याशिवाय नुकत्याच आलेल्या शाहिद कपूरच्या 'देवा'सिनेमातही तिची भूमिका होती.

'रामायण'मध्ये कोण कोण असणार?

'रामायण'सिनेमात अभिनेत्री इंदिरा कृष्णन माता कौसल्याची भूमिका साकारत आहे. त्यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, रणबीर श्रीरामाच्या भूमिकेत आहे, साई पल्लवी माता सीताची भूमिका साकारत आहे. यश रावण साकारणार आहे हेही त्यांनी कन्फर्म केलं. अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे तर अरुण गोविल दशरथाची भूमिका साकारत आहेत. अभिनेत्री लारा दत्ता कैकयीची भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :कुबरा सैतरामायणसिनेमाबॉलिवूडरणबीर कपूर