Join us

क्रांती रेडकरला रोज येतात जीवे मारण्याच्या धमक्या, म्हणाली-सोशल मीडियावर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 13:50 IST

एका मुलाखतीत क्रांतीने वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला. यावेळी तिने तिच्या आणि पती समीर वानखेडे यांच्या आयुष्यातील सिक्रेट्स सांगितली.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे आणि या माध्यमातून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अलिकडेच क्रांतीने प्लॅनेट मराठी ओटीटीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारे आली होती. यावेळी तिने अनेक गोष्टींचा उलगडा केला.  

  तिच्या आणि समीर वानखेडे यांच्या आयुष्यातील असेच काही सिक्रेट्स या टॉकशोमध्ये तिने उघड केले आहेत. यावेळी तिने श्रीशांतसोबत जोडल्या गेलेल्या नावाच्या मागे काय तथ्य आहे, याचाही खुलासा केला आहे. तिने एक भयाण गोष्टही सांगितली, तिला अनेकदा सोशल मीडियावर मारण्याच्या धमक्याही येतात. मात्र अशा धमक्यांना ती काय प्रतिउत्तर देते, हे आपल्याला हा एपिसोड पाहिल्यावर कळेल. 

या टॉक शोमध्ये क्रांतीसोबत तिची खास मैत्रीण उर्मिला कोठारेही आहे. प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास मानणाऱ्या उर्मिलाने यावेळी प्रेमात जर या दोन्ही गोष्टी मिळत नसतील तर दुसरं प्रेम शोधावं, असे धाडसी मतही व्यक्त केले. क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारेनी भरपूर गप्पा मारल्या असून या टॉकशोमध्ये त्या खूप धमालमस्ती करताना दिसणार आहेत.

टॅग्स :क्रांती रेडकर