Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: मुंबई इंडियन्सची मॅच बघण्यासाठी Ex पतीसोबत दिसली 'ही' अभिनेत्री; ६ वर्षांपूर्वी झालेला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:26 IST

मुंबई इंडियन्सच्या सामन्यात बॉलिवूडमधील एका जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या एक्स पतीसह दिसली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. अभिनेत्रीचा एक्स पतीही अभिनेताही आहे

आयपीएल २०२६ चा उत्साह सध्या शिगेला पोहोचला असून, वानखेडे स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यात बॉलिवूडमधील एका जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या एक्स पतीसह दिसली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. अभिनेत्रीचा एक्स पतीही अभिनेताही आहे. ही जोडी म्हणजे अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी. हे दोघेही मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) चिअर करण्यासाठी एकत्र दिसले.

कोंकणा आणि रणवीर यांचा घटस्फोट जरी झाला असली तरी मुलगा हारूनसाठी ते नेहमीच एकत्र येतात. आयपीएलच्या या सामन्यातही ते हारूनसोबत मुंबई इंडियन्सची जर्सी घालून संघाला पाठिंबा देताना दिसले. आई-वडिलांसोबत हा सामना पाहताना हारुनच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून जातोय. रणवीरने हा फॅमिली सेल्फी पोस्ट केला असून चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

घटस्फोट झाल्यानंतरही सोशल मीडियावर या दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. नेटकरी या जोडीचे कौतुक करत आहेत की, घटस्फोटानंतरही आपल्या मुलाच्या आनंदासाठी आणि त्याला चांगले भविष्य देण्यासाठी ते ज्या प्रकारे मैत्री टिकवून आहेत, ते कौतुकास्पद आहे. वानखेडे स्टेडियममधील व्हीआयपी बॉक्समध्ये बसून त्यांनी सामन्याचा मनमुराद आनंद लुटला.

२०१० मध्ये रणवीर-कोंकणाने एकमेकांशी लग्न केलं होतं. परंतु २०१५ मध्ये लग्नाच्या ५ वर्षांनी त्यांनी घटस्फोट जाहीर केला. या दोघांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया २०२० मध्ये पूर्ण झाली. दोघांनी संगनमताने मुलाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. आता घटस्फोटाच्या सहा वर्षांनी या दोन दिग्गज कलाकार जोडीला एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Konkona Sen Sharma and Ex-Husband at IPL Match: A Reunion?

Web Summary : Konkona Sen Sharma and Ranvir Shorey, despite their divorce, were spotted together at an IPL match with their son, cheering for Mumbai Indians. The family outing sparked positive reactions online, with many praising their co-parenting approach.
टॅग्स :रणवीर शौरीकोंकणा सेन शर्माघटस्फोटमुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्सआयपीएल २०२६ऑफ द फिल्ड