Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा, सोशल मीडियावर ही तरूणी आहे करिश्मा कपूरची डुप्लिकेट, युजर्स म्हणतायेत ये तो 'कुदरत का करिश्मा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 13:23 IST

बघता -बघता हिनाने करिश्मा बनत सा-यांच्या मनाचा ताबा मिळवला आहे.

एकाच चेह-याच्या आणि सेम टू सेम दिसणा-या सात व्यक्ती  जगात असतात असं म्हटलं जातं. त्यातही बॉलीवूड किंवा सेलिब्रिटीजचे डुप्लिकेट असतातच. आतापर्यंत यात अनुष्का शर्मा,सलमान खान , ऐश्वर्या राय बच्चन , माधुरी दिक्षित, प्रियांका चोप्रा, ऋतिक रोशन यांचे डुप्लिकेट बऱ्याच जणांना माहित आहेत. अशाच सेम टू सेम दिसणा-या व्यक्तींमध्ये करिश्मा कपूरच्याही लूक अ लाईकची एंट्री झाली आहे. ही तरूणी हुबेहुब करिश्मा कपूरसारखी दिसते. 

सध्या तिचे व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. या मुलीचं नाव हिना असून करिश्माच्याच सिनेमाच्या डायलॉगचे व्हिडीओ शेअर करताना ती दिसते. हिनाचे 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.जरा नीट पाहिले तर हिना आणि करिश्माच्या चेह-यामध्ये खूप साम्य दिसून येईल. हिनाला पाहताच युजर्सही तिच्या व्हिडीओंवर कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करताना दिसतात.

90 च्या दशकात करिश्माने आपल्या अभिनयाने सा-यांची मनं जिंकली. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये तिचीही गणना केली जाते. बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि सिनेमातील भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या करिष्मा कपूरकडे ‘फॅशन डिवा’ म्हणूनही पाहिलं जातं.दोन मुलांची आई असणारी ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यांने नेहमीच अनेकांना घायाळ करते.लग्नानंतर करिश्मा बॉलिवूडपासून लांब गेली असली तरी आजही चाहत्यांमध्ये करिश्माची जादू कायम आहे. त्यामुळे जेव्हा हिनाला लोकांनी पाहिले तेव्हा करिश्माच असल्याचा भास त्यांना झाला.

बघता -बघता हिनाने करिश्मा बनत सा-यांच्या मनाचा ताबा मिळवला आहे. सामान्य मुलगी आज सोशल मीडियावर अनेकांची पहिली पसंती बनली आहे. 

 

टॅग्स :करिश्मा कपूर