मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूरचे खास फोटोज नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी चर्चेत असलेला फोटो फारच खास आहे. खास यासाठी आहे कारण हे तिचं एका मॅगझिनच्या कव्हरसाठी केलेलं पहिलं फोटोशूट आहे.
जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केलाय. वोग मॅगझिनच्या कव्हरवर जान्हवी फारच सुंदर दिसत आहे. जान्हवी कपूर लवकर रुपेरी पडद्यावर दिसणार असून तिच्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. तिचा धडक हा सिनेमा रिलीज होणार आहे.
याआधी जान्हवी पीपल या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती. पण त्यावेळी त्या फोटोत तिच्यासोबत तिची आई श्रीदेवी आणि बहीण खुशीही होती.