Join us

अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशी 'या' अभिनेत्याला करतेय डेट? ओरीच्या पोस्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 14:10 IST

जान्हवीनंतर आता खुशीही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण ती कुणाला डेट करतेय, हे माहीत आहे का तुम्हाला?

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूरच्या मुली अर्थातच बाॅलिवूडच्या सुंदर बहिणी खुशी कपूर आणि जान्हवी कपूर यांचं खासगी आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. जान्हवीनंतर आता खुशीही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. झोया अख्तरच्या 'द आर्चिस' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. पण ती कुणाला डेट करतेय, हे माहीत आहे का तुम्हाला?

तर खुशी कपूर 'द आर्चिस'  या सिनेमातला तिचा सहकलाकार वेदांग रैना याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ओरहान अवत्रमनी उर्फ ओरी यानं त्याच्या इंस्टाग्राम शेअर केलेल्या एका स्टोरीमुळं खुशी आणि वेदांग यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे. पण, खुशी किंवा वेदांग या दोघांनीही या अफवांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

नुकतेच 5 नोव्हेंबरला खुशी कपूरने तिचा वाढदिवस साजरा केला. जान्हवी कपूर, शिखर पहाडिया,वेदांग रैना आणि ओरहान अवत्रमनी उर्फ ओरी हे चौघे एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाले. ओरीने इन्स्टा स्टोरीवर खुशीचा केक कापतानाचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये वेदांग खुशीच्या शेजारी बसलेला दिसत आहे. यासोबत ओरीने एक ग्रुप फोटो देखील पोस्ट केला. यानंतर खुशी आणि वेदांग यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे.

खुशीचा 'द आर्चिस' सिनेमा 7 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हा सिनेमा अमेरिकन लोकप्रिय कॉमिक्स 'द आर्चीज'वर आधारित असून 1960 च्या काळावर भाष्य करणारा आहे.  मैत्री,फ्रिडम, प्रेम आणि हार्ट ब्रेक हे सर्व 'द आर्चीज' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.  

टॅग्स :खुशी कपूरजान्हवी कपूरबॉलिवूड