अभिनेत्री हिना खान ही सध्या अनेकांसाठी एक प्रेरणादायी सेलिब्रिटी म्हणून चर्चेत आहे. हिना खान सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराशी लढत असूनही हिना अत्यंत सकारात्मक आहे. आयुष्यात कितीही संकटं आली तरी त्याला धीराने कसं तोंड द्यावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे हिना खान. हिना नुकतीच 'इंडियाज बेस्ट डांसर'च्या मंचावर सहभागी झाली होती. त्यावेळी तिने कॅन्सरचं निदान झाल्यावर घरी कसं वातावरण होतं, हे सांगितलं.
हिना खानने घरी गोड का मागवलेलं?
हिना खान इंडियाज बेस्ट डान्सरच्या मंचावर म्हणाली की, "त्या रात्री मला कॅन्सर झालाय हे समजलं. माझा पार्टनर (रॉकी जयस्वाल) घरी आला. डॉक्टरांनी मला काही सांगितलं नव्हतं. रॉकी मला फोनवरच सांगितलं की Malignancy म्हणजेच रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. याशिवाय रॉकी घरी यायच्या आधी मी माझ्या भावाला सर्वांसाठी फालूदा आणायला सांगितला. कारण घरी काहीतरी गोड आणलं तर सर्व काही चांगलं होईल. प्रत्येकजण या गोष्टीला सकारात्मक दृष्टीकोनातून बघतील."
हिना खानची ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज
३७ वर्षीय हिना खानला गेल्या वर्षी २०२४ मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. हिनाने तिच्या सोशल मीडियावर वारंवार तिच्या तब्येतीविषयी खुलासा केला आहे. तिने आजवर अनेक किमोथेरपी केल्या आहेत. शारीरिक त्रास होऊनही हिना मानसिकरित्या सक्षम आहे. ती तिच्या पोस्टमधून कायम सकारात्मक संदेश चाहत्यांना देत असते. हिना खान आज सर्वांसाठी एक प्रेरणादायी सेलिब्रिटी आहे.