Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री गौतमी देशपांडेचा विंटर लूक होतोय व्हायरल, चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 15:02 IST

'माझा होशील ना” या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली.

अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. गौतमी इन्स्टाग्रामवर तिचे विंटर लूकमधील फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये गौतमी वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. गौतमीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहे. गौतमीचे विंटर लूक सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. गौतमीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

झी मराठीवरील ”माझा होशील ना” या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. माझा होशील ना ही मालिका चांगलीच लोकप्रिय होतेय. विराजस कुलकर्णी या तिच्या लहानपणीच्या मित्रासोबतच पडद्यावर नायिका साकारण्याची संधी मिळाल्याने या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. गौतमीने कमीवेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवतअभिनयात पदार्पण अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत. सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे.अभिनयाशिवाय ती एक उत्तम गायिका आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमी गाण्याचा वारसा तिला तिच्या आजीकडून आला आहे.

टॅग्स :गौतमी देशपांडे