Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिकसोबतच्या अफेअरबाबत ईशा गुप्ताची प्रतिक्रिया, नात्याबाबत केला मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 17:17 IST

हार्दिक पांड्यासोबतच्या रिलेशनवर ईशाने पहिल्यांदाच जाहीरपणे वक्तव्य केलं आहे आणि या नात्याबाबत सत्य सांगितलं आहे. 

मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या हा त्याच्या मैदानातील खेळासोबतच त्याच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत असतो. आधी अभिनेत्री एली अवराम नंतर उर्वशी रौतेला आणि आता अभिनेत्री ईशा गुप्तासोबत पांड्याच्या अफेअरची चर्चा होत आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. हार्दिक पांड्यासोबतच्या रिलेशनवर ईशाने पहिल्यांदाच जाहीरपणे वक्तव्य केलं आहे आणि या नात्याबाबत सत्य सांगितलं आहे. 

ईशा गुप्ताने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, 'या चर्चांमध्ये तितकीच सत्यता आहे जितकी तुम्ही वाचली आहेत. लोक तर बोलत राहणारच, त्याचं बोलणं काम आहे. काहीही लिहिलं तरी ती माझी खरी बाजू आहे, जी मला माहीत आहे. याबाबत मी नाही ही म्हणत नाहीये आणि हो सुद्धा म्हणत नाहीये'.

पांड्यासोबतच्या रिलेशनच्या चर्चेला अशाप्रकारे वक्तव्य करुन ईशाने आणखीन हवा दिली आहे. तिच्या बोलण्यावरुन तरी वाटतंय की, दोघांबाबत जी चर्चा होत आहे ती केवळ अफवा नाहीये. दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरु आहे. ईशाने आपल्या हार्दिकसोबतच नातं खुलेआम स्विकारलं नसलं तरी तिने नकारही दिला नाहीये. पण ईशासोबतच्या रिलेशनशिपबाबत हार्दिक पांड्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाहीये. पण दोघांना अनेकदा एकत्र बघण्यात आलं आहे. 

ईशा ही बऱ्याच महिन्यांपासून सिनेमापासून दूर आहे आणि लवकरच टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. ती एका डान्स शोमध्ये जज म्हणून दिसणार आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्या सद्या इंग्लंड दौऱ्यावर असून टेस्ट सीरिज खेळत आहे.

टॅग्स :ईशा गुप्ताहार्दिक पांड्याबॉलिवूडसेलिब्रिटी