Join us  

Dhanashri Kadgaonkar : "असं वाटलं खूप मोठी चूक झाली माझ्याकडून..."; धनश्री काडगावकरची लेकासाठी हृदयस्पर्शी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 11:05 AM

Dhanashri Kadgaonkar : अभिनेत्रीने लेकासाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. धनश्रीला कबीर नावाचा एक गोड मुलगा आहे. 

झी मराठीवरील 'तू चाल पुढं'  (Tu Chal Pudhe) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेत येणारी वळणं आणि चढउतार यामुळे ती दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे. इतकंच नाही तर या मालिकेमध्ये अभिनेत्री धनश्री काडगावकरने (Dhanashri Kadgaonkar) नकारात्मक भूमिका साकारुनही लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा आहे. याच दरम्यान अभिनेत्रीने लेकासाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. धनश्रीला कबीर नावाचा एक गोड मुलगा आहे. 

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कबीरचा एक व्हिडीओ शेअर करत धनश्रीने एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. "कबीर फक्त दीड वर्षांचा होता जेव्हा मी त्याला सोडून काम करायला सुरुवात केली.. पुणे सोडून मुंबईत आले.. लगेच त्याला इथे आणणं शक्य नव्हतं. त्याचं vaccination, doctors सगळं पुण्यात होतं. असं वाटलं खूप मोठी चूक झाली माझ्याकडून किंवा घाई केली का मी.. थोडं थांबायला हवं होतं.. निदान तो बोलू लागे पर्यंत तरी.. तो मला विसरून जाईल का असंही वाटलं होतं.. पण ती एक phase असते, ती पास झाली कि गोष्टी होतात सगळ्या नीट..."

"खरंतर अजून कबीर ने सिरीयल बघितली पण नाहीय्ये.. मुळात त्याला Tv च अजून introduce केला नाहीये आम्ही... त्याला फक्त इतकच माहितीये कि आई शूटिंग करते, मेकअप करते. मी नाहीय्ये म्हणून त्याने आजपर्यंत कधीच असा खूप गोंधळ घातला नाही (या गोष्टी चं बरं हि वाटतं पण तितकंच वाईट पण वाटतं. सगळ्या new working moms सहमत असतील याला अजून तरी कबीर छान सपोर्ट करतोय , पुढचं माहित नाही. या सगळ्यात दुर्वेश आई आणि बाबा असं दोन्ही बनून गेला..."

"त्याला एके दिवशी सांगितलं कि मी शिल्पी नावाचं character करते, तेव्हा तो शब्द कदाचित त्याला खूप आवडला आणि त्या नावात, त्या शब्दात त्याला काहीतरी गंम्मत वाटली असावी म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा तो शिल्पी म्हणतोय तेव्हा तेव्हा तो खूप हसतोय...  आत्ता हि सुरुवात आहे, वाट बघीन मी, त्याच्या कडून हे ऐकायची कि, “आई तू खूप छान काम करतेस .. आणि असंच काम करत राहा .. तू मला फार वेळ देऊ शकत नाहीस पण तू माझ्या भविष्याची तरतूद करतेयस.. आणि त्या पेक्षा महत्वाचं म्हणजे तू तुझी passion follow करतेय ...” बास ..आणखी काय हवं असेल मला.. असेच छान छान प्रोजेक्ट्स मला मिळत राहो .. तुम्हा सगळयांचं प्रेम असंच राहू द्या..." असं अभिनेत्री धनश्री काडगावकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :धनश्री काडगावकरटेलिव्हिजन