Allu Arjun Post: सध्या मनोरंजनविश्वात अल्लू अर्जुन (Allu Arjun)आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा-२' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. 'पुष्पा: द राइज' या पहिल्या भागाचा हा सीक्वल जवळपास ३ वर्षानंतर आज ५ डिसेंबरच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सुकुमार दिग्दर्शित या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा दुसरा भाग जगभरात प्रदर्शित करण्यात आला आहे. २०२४ मधील सर्वाधिक चर्चा असलेल्या बिग बजेट चित्रपटांपैकी एक 'पुष्पा-२' हा एक सिनेमा आहे. या चित्रपटाची क्रेझ देशातच नाही तर जगभरात आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनला त्याचे चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्यात मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही कुठे कमी नाही, पुष्पा- २ मोठ्या पडद्यावर येण्याआधी सेलिब्रिटींना अभिनेत्याला वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अल्लू अर्जुनला त्याचा मित्र म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडाने (Vijay Devarkonda) हटके गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्टही तितकंच खास आहे. सोशल मीडियावर याचा फोटो शेअर करत अभिनेत्याने त्याचे आभार मानले आहेत.
विजय देवरकोंडाने 'पुष्पा-२' च्या प्रदर्शनाआधी अल्लू अर्जुनला कस्टम जॅकेट गिफ्ट म्हणून दिलं होतं. शिवाय त्या जॅकेटवरील 'Rowdy Pushpa' असं लिहलेलं हे नाव नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अल्लू अर्जुननेही सोशल मीडियावर या गिफ्टचा फोटो पोस्ट केलाय. या पोस्टसह विजय देवरकोंडाला टॅग करत कॅप्शनमध्ये त्याने लिहलंय की, "विजय माझ्या मित्रा तुझे मनापासून आभार!" अल्लू अर्जुनच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. शिवाय 'पुष्पा किंग', 'फायर पुष्पा राऊडी' अशा कमेंट्स देखील त्यांनी केल्याच्या पाहायला मिळत आहेत.
जवळपास ४०० ते ५०० कोटी रुपयांदरम्यान बजेट असलेला पुष्पा-२ हा चित्रपट जगभरात १२,५०० स्क्रीन्सवर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.