सध्या नॅशनल क्रश म्हणून मराठी अभिनेत्री गिरीजा ओकला ओळखलं जातं. गिरीजा ओकचे सध्या फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशातच गिरीजाने तिचा मित्र आणि अभिनेता शरीब हाश्मीसोबत मराठी गाणं गायलं आहे. विशेष म्हणजे 'द फॅमिली मॅन' फेम जेकेसोबत गिरीजाने सुंदर आवाजात 'रुपेरी वाळूत, माडांच्या बनात...' हे गाणं गायलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.गिरीजा आणि जेकेचं गाणं व्हायरल
गिरीजा ओकने आणि शरीब हाश्मीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना...' हे गाणं गाताना दिसतात. शरीब हिंदी असून तो उत्कृष्टपणे हे गाणं गाताना दिसतो. दोघांची गायनाची जुगलबंदी पाहून नेटकरी थक्कच झालेत. अमृता खानविलकर, मंजिरी फडणीस, आकांक्षा गाडे, ऋचा इनामदार अशा अनेक कलाकारांनी गिरीजा आणि शरीबच्या गाण्याला पसंती दिली आहे आणि हार्ट इमोजी शेअर केला आहे. शरीब दर मंगळवारी एखादं गाणं गाऊन त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.
गिरीजा आणि शरीबच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, गिरीजा सध्या विविध जाहिरातींमध्ये आणि सिनेमांमध्ये काम करताना दिसतेय. गिरीजा सोशल मीडियावर सक्रीय असून तिची एक मुलाखत व्हायरल झाल्याने तिला नॅशनल क्रश म्हणून सध्या ओळखलं जातंय. तर शरीब हाश्मी नुकतंत 'द फॅमिली मॅन ३' या वेबसीरिजमध्ये आणि 'गुस्ताख इश्क' या सिनेमात झळकला.
Web Summary : National crush Girija Oak and 'The Family Man' fame JK sang the Marathi song 'Ruperi Valut.' The video went viral, with many celebrities praising their duet. Sharib Hashmi also featured in the Instagram video.
Web Summary : नेशनल क्रश गिरिजा ओक और 'द फैमिली मैन' फेम जेके ने मराठी गाना 'रूपेरी वाळूत' गाया। वीडियो वायरल हो गया, कई हस्तियों ने उनके गायन की प्रशंसा की। शरीब हाशमी भी इंस्टाग्राम वीडियो में दिखे।