Join us

Video - "हिंदुस्थानला हिंदू राष्ट्राकडे घेऊन जाणारे पंतप्रधान"; शरद पोंक्षेंनी केलं मोदींचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 16:16 IST

Actor Sharad Ponkshe And PM Narendra Modi : अभिनेते शरद पोंक्षे य़ांनीही नरेंद्र मोदींनी शुभेच्छा देत त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींचे नाव केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील आघाडींच्या नेत्यांमध्येही सामील आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजपा नेत्यांबरोबरच विरोधी पक्षांचे नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत विविध क्षेत्रांतील मंडळींनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 

अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) य़ांनीही नरेंद्र मोदींनी शुभेच्छा देत त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. इन्स्टाग्रामवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी युट्युबची एक लिंक देखील शेअर केली आहे. यामध्ये शरद पोंक्षे यांनी स्वतः तयार केलेला एक व्हिडीओ आहे. भारत देशाला हिंदू राष्ट्राकडे घेऊन जाणारे पंतप्रधान असं म्हणत नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत आहेत. तसेच त्यांच्या कामावर भाष्य करत आहेत.

 

"हिंदुस्थानला नवी चेतना देणारे पंतप्रधान”

"नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा! हिंदुस्थानला नवी चेतना देणारे पंतप्रधान. हिंदुस्थानला हिंदू राष्ट्राकडे घेऊन जाणारे पंतप्रधान. हिंदुस्थानात "होय आम्ही हिंदू आहोत" हे ताठ मानेनं म्हणण्याचं धारिष्ट्य निर्माण करणारे पंतप्रधान. अशा पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त केलेली ही ध्वनी चित्रफीत" असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

"देव, देश अन् धर्माला वाहून घेतलेला समर्थ नेता"

"देव, देश अन् धर्माला वाहून घेतलेला समर्थ नेता गुजरातला मिळाला आणि नरेंद्र मोदी निवडून आले... मोदी कळणं फार अवघड आहे. भविष्यात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी हे स्वप्न आहे. आमच्या लाडक्या पंतप्रधानांना... नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा" असंही शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :शरद पोंक्षेनरेंद्र मोदीहिंदू