Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलूनच्या बाहेर स्वतःचा फोटो पाहताच संतोष जुवेकर म्हणाला, "आता पोरं दुकानात जाताना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 14:04 IST

संतोष जुवेकरने एका सलूनच्या बाहेर स्वतःचा फोटो पाहिला. आणि ते पाहून संतोष जुवेकरने एक खास पोस्ट लिहिलीय (santosh juvekar)

अभिनेता संतोष जुवेकर हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संतोष कायम सोशल मीडियावर त्याच्या आयुष्यातले विविध अपडेट्स शेअर करत असतो. संतोषने नुकतंच सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. यात त्याने एका केश कर्तनालयाबाहेर त्याचा फोटो पाहिला. हा फोटो पाहून संतोषने एक खास आठवण सांगितली आहे. संतोष लिहितो, "लहानपणी बाबा सलून मधे केस कापायला घेऊन जायचे तेंव्हा केसकपणारे उत्तम काका मला त्यांच्या दुकानातल्या भिंतीवर लावलेल्या अनेक हिरोंचे फोटो दाखवून विचारायचे "

संतोष पुढे लिहिते, "बाळा बोल कुणासारखे कापू केस तुझे.... अमिताभ बच्चन सारखे की मिथुन सारखे की अनिल कपूर सारखे की शारुख खान सारखे की सलमान खान सारखे............. आणि मग त्यातला मी एक फोटो निवडायचो आणि सांगायचो. पण ते कापायचे तसेच जसे बाबा त्यांना सांगायचे (दोघ मिळून हया लहान जीवाला चु....... बनवायचे ) असो ते महत्वाचं नाही तर सांगायचं कारण हे की काल shootla जाताना अचानक मला रस्त्यात एक केश करतनालाय (सलून, hair dresser's ) दुकान दिसलं आणि त्याच्या नावाच्या बोर्ड वर चायला चक्क माझा फोटो लावला होता त्या भावान.."

संतोष शेवटी सांगतो, "आता बहुतेक पोर दुकानात जाताना बाहेरच ठरवत असतील कुणासारखे केस कापायचे ते.. ये बाप्पू...... साल्ला अपून तो हिरो बनगया!!!! बोला तो बोला.. जय महाराष्ट्र.." संतोष आपल्याला विकी कौशलच्या आगामी छावा सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात विकी कौशल संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असून संतोष विशेष भूमिकेत झळकणार आहे.

टॅग्स :संतोष जुवेकरमराठीविकी कौशलसंभाजी राजे छत्रपती