Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता संजय खानच्या लेकीने विचारले अमित शाह कुठे आहेत? नेटक-यांनी असे दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 18:06 IST

तूर्तास फराह खान अली एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे. 

ठळक मुद्देफराह खान अली ही अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. 

कोरोना व्हायरसचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे बॉलिवूडचे सेलिब्रिटी कधी नव्हे इतके सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. अभिनेता संजय खानची लेक फराह खान अली ही सुद्धा याला अपवाद नाही. तूर्तास फराह खान अली एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे. होय, आपल्या ट्विटमध्ये फराहने थेट गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले आणि तिचे ट्विट बघता बघता व्हायरल झाले.

‘काय गृहमंत्री अजूनही बेपत्ता आहेत. ते खूप दिवसांपासून कुठल्याही न्यूज चॅनल वा मीडियात दिसले नाहीत. ऐरवी ते आलेत की, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. अमित शहा कुठे आहेत? खरच जाणून घ्यायचेय. कुणाला याबद्दल काही ठाऊक आहे?’ असे अनेक सवाल तिने आपल्या ट्विटमधून केले. मग काय होणार, फराहच्या या ट्विटवर कमेंटचा जणू पूर आला़ अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्यात.

अमित शाहजी, हिला तुमची आठवण येतेय. जरा कागदाबद्दल विचारा तिला,’ असे एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरने, ‘अमित शाह एनआरसी व एनपीआरचा ड्राफ्ट तयार करण्यात बिझी आहेत,’ असे कमेंट करताना लिहिले.

एका युजरने तर यावरून फराहची जाम मजा घेतली. ‘तोए का काम है देवी, माननीय गृहमंत्री ते़ काईकू परेशान है रई है,’ असे या लिहिले.

कोण आहे फराह खान अली

फराह खान अली ही अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. ती पेशाने ज्वेलरी व फॅशन डिझाईनर आहे. अनेकदा ती राजकीय मुद्यांवर आपले मत मांडताना दिसते. हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान ही फराहची बहीण. अभिनेते फिरोज खान तिचे काका आहेत तर अभिनेता फरदीन खान चुलत भाऊ आहे.

टॅग्स :संजय खानअमित शाह