Join us

अखेर थाटात पार पडला राजकुमार-पत्रलेखाचा लग्नसोहळा; फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 19:41 IST

Rajkumar rao : राजकुमारने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करुन चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. सोबतच पत्रलेखासाठी खास पोस्टही लिहिली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता राजकुमार राव (rajkumar rao ) आणि पत्रलेखा (patralekhaa ) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होते. परंतु, या दोघांनीही या चर्चांवर भाष्य केलं नव्हतं. मात्र, आज अखेर राजकुमारने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करुन चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. सोबतच पत्रलेखासाठी खास पोस्टही लिहिली आहे.

"अखेर...११ वर्षांचं प्रेम, रोमान्स, मैत्री, आनंदाचे क्षण या सगळ्यानंतर मी माझ्या सर्वस्वासोबत लग्न केलं आहे. माझा आत्मा, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण, माझं कुटुंब.. तुझा पती म्हणून माझी ओळख होणं यापेक्षा दुसरा कोणताच आनंद नाही", पत्रलेखा, अशी पोस्ट शेअर करत राजकुमार रावने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. सोशल मीडियावर यांच्या प्री-वेडिंग फंक्शनचे काही फोटोदेखील व्हायरल झाले होते. त्यानंतर आज राजकुमारने स्वत: लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. राजकुमार-पत्रलेखा यांचा हा लग्नसोहळा चंदीगढमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. 

टॅग्स :राजकुमार रावपत्रलेखासेलिब्रिटीबॉलिवूड