Join us

Prabhas : प्रभासचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं की डिलीट? प्रोफाइल अचानक गायब झाल्याने फॅन्सना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 15:43 IST

Prabhas : अभिनेता प्रभासचं इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब झालं आहे

अभिनेता प्रभासचंइन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब झालं आहे. प्रोफाईल गायब झाल्याने त्याचे चाहते दु:खी झाले असून अभिनेत्याचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काही युजर्स हे अभिनेत्याने स्वत:चं त्याचं अकाऊंट डीएक्टिवेट किंवा डिलीट केल्याचं म्हणत आहेत. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून प्रभासच्या टीमनेही काहीही सांगितलं नाही. 

प्रभासचं इन्स्टाग्राम अकाउंट गायब झाल्याची बातमी वेगाने पसरली आहे. मात्र, अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी आणि सामान्य युजर्सची खातीही या पद्धतीने गायब झाली आहेत. ग्लोबल हॅकिंगमुळे हे घडत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. प्रभास इन्स्टाग्रामवर जास्त सक्रिय नसतो. त्यामुळेच अभिनेत्याचे अकाऊंट हॅक झाल्याचं बहुतांश चाहते आणि युजर्सचं मत आहे.

सध्या प्रभास दिग्दर्शक मारुतीच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'प्रोजेक्ट के' असे होते. प्रभासचे चाहते प्रशांत नीलच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'सलार : भाग 1 - सीझफायर' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

हा चित्रपट आता 22 डिसेंबर 2023 रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. मात्र आता प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाल्याने त्याचे कोट्यवधी चाहते चिंतेत आहेत. अभिनेते किंवा त्याच्या टीमकडून लवकरच अकाऊंट पूर्ववत होईल अशी आशा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :प्रभासइन्स्टाग्राम