Join us
Daily Top 2Weekly Top 5

'एसीपी प्रद्युम्न'च्या जागी 'एसीपी आयुषमान'! CID 2 मध्ये 'हा' अभिनेता करणार शिवाजी साटम यांना करणार रिप्लेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 08:59 IST

'सीआयडी २' मालिकेत हा लोकप्रिय अभिनेता शिवाजी साटम यांच्या जागी दिसणार आहे. कोण आहे तो? (cid 2)

'सीआयडी २' (CID 2) मालिकेची चांगलीच चर्चा आहे. या मालिकेतून एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम यांची मालिकेतून एक्झिट झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 'सीआयडी २'मध्ये एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू दाखवण्यात आल्याने मालिकेच्या ट्रॅकमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अशातच शिवाजी साटम (Shivaji satam) यांच्या एक्झिटनंतर मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. कोण आहे हा अभिनेता? शिवाजी साटम यांना रिप्लेस करणाऱ्या या अभिनेत्याचं नाव काय, जाणून घ्या.

'सीआयडी २'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री

शिवाजी साटम यांची 'सीआयडी २' मालिकेतून एक्झिट झाली. त्यांच्या जागी आता मालिकेत पार्थ समथान या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. पार्थ हा एसीपी आयुष्मानच्या भूमिकेत झळकणार आहे. एसीपी प्रद्युम्न यांची हत्या कोणी केली याशिवाय त्या प्रकरणाशी संबंधित तपास करण्यासाठी एसीपी आयुषमान यांची मालिकेत एन्ट्री होणार आहे. एकूणच शिवाजी साटम यांनी गेली अनेक वर्ष 'सीआयडी' मालिकेत एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका गाजवली. त्यानंतर त्यांच्या जागी काम करणं हे पार्थसाठी मोठं आव्हान असेल. 

अभिनेता पार्थ समथान याविषयी म्हणाला की, "सीआयडी हा सोनी टीव्ही चॅनलवरील एक आयकॉनिक शो आहे. जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारणा आली तेव्हा ही मालिका करावी की नाही, या गोंधळात मी होतो. परंतु मालिकेच्या विषयाकडे बघता ही माझ्यासाठी सन्मानजनक गोष्ट होती. मी जेव्हा माझ्या कुटुंबाला याविषयी सांगितलं तेव्हा त्यांना वाटलं मी मस्करी करतोय. परंतु जेव्हा त्यांना खरं समजलं तेव्हा त्यांना अभिमान वाटला.", अशाप्रकारे पार्थने 'सीआयडी २' मालिका स्वीकारल्यावर पार्थने त्याच्या भावना व्यक्त केल्या 

टॅग्स :शिवाजी साटमसीआयडीटेलिव्हिजनबॉलिवूड