Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता पंकज विष्णू आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळींचा 'तो' फोटो चर्चेत, होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 16:34 IST

दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि अभिनेते पंकज विष्णू यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि अभिनेते पंकज विष्णू यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे दोघे तब्बल १७ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.  पंकज विष्णू मंदार देवस्थळी यांच्या २००५ मधील 'अवघाची हा संसार' मालिकेत झळकला होता. त्यानंतर आता मंदार देवस्थळी यांच्या 'ह्रदयी प्रीत जागते' या मालिकेत दिसणार आहे. 

दिग्दर्शकला कॅप्टन ऑफ द शीप का म्हणतात? ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे दिग्दर्शक मंदार देवस्थळी. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांना सतत नवीन काहीतरी देत असतानाच आपल्या नवीन कलाकारांसह ज्येष्ठ अनुभवी कलाकारांची योग्य सांगड कशी घालावी ही त्यांची कला वाखाणण्याजोगी आहे. हृदयी प्रीत जागते मालिकेच्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि अभिनेते पंकज विष्णू यांच्या मैत्रीची आणि एकत्र रंगणाऱ्या कामाची साक्ष असलेला १७ वर्षांपूर्वीचा एक फोटो पंकजला नुकताच सापडला, जुन्या आठवणींना उजाळा देत आणि आजच्या ट्रेंड नुसार जुनी आठवण नव्याने त्यांनी टिपली. 

'हृदयी प्रीत जागते' ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा आहे. ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.हे दोघेही त्यांच्या स्वभावात आणि जीवनशैलीत वेगळे ध्रुव आहेत पण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहे. नायिका कीर्तन गायिका आहे आणि त्यांच्या घरात कीर्तनाची परंपरा आहे. तर नायक रॉक बँड परफॉर्मर आहे. ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे. पंकज विष्णू, राजन भिसे, पौर्णिमा तळवलकर यांसारख्या एका पेक्षा एक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाचा आस्वाद मालिकेच्या निमित्ताने घेता येणार आहे. आता हेच संगीत ह्या दोन आत्म्यांना कसं एकत्र आणते हे बघणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं असणार आहे. 

टॅग्स :मंदार देवस्थळीटिव्ही कलाकार