Join us

लोकप्रिय अभिनेत्याच्या घरी झाली चोरी, विश्वासू नोकरानेच १० लाख रुपये केले लंपास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 12:16 IST

अभिनेत्याच्या घरातील विश्वासू नोकराने 10 लाख रुपयांची रोख रक्कम चोरली.  

Mohan Babu House Robbery :  लोकप्रिय तेलुगु अभिनेता मोहन बाबू यांच्या घरी चोरी झाली आहे. घरातील विश्वासू नोकराने 10 लाख रुपयांची रोख रक्कम चोरली.  या प्रकरणात नोकराला अटक करण्यात आली आहे.  मात्र चोरी झालेली पुर्ण रक्कम मिळाली नाही. 7.36 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली. तर उर्वरित रक्कम नोकराने आधीच खर्च केली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  22 सप्टेंबर रोजी मोहन बाबू यांच्या घरी चोरी झाली होती. एक दिवशी मोहन बाबूच्या सचिवाने10 लाख रुपये रोख रक्कम खोलीत ठेवली.  पण तेथून पैसे चोरीला गेल्याचे उघड झालं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांना नोकरावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा करुन नोकराला तिरुपती येथून अटक केली आहे. मात्र, या प्रकरणी अभिनेत्यानं कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

मोहन बाबू यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार आहेत. . अभिनेता होण्यापूर्वी त्यांनी भारतीय चित्रपट उद्योगात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.  त्यांनी सुमारे 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  अभिनेता मोहन बाबू शेवटचा 2023 मध्ये आलेल्या 'शकुंतलम' चित्रपटात अभिनेत्री सामंथासोबत दिसले होते. या सिनेमात त्यांनी दुर्वासा महर्षींची भूमिका साकारली होती. मोहन बाबू यांना 2007 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीचोरी