Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 09:23 IST

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी वाडकरचा थाटामाटात साखरपुडा झाला आहे

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणजे जयवंत वाडकर. वाडकर कुटुंबाच्या घरी एक आनंदाची बातमी आली आहे. जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी वाडकरचा साखरपुडा झाला आहे. स्वामिनीचा थाटामाटात साखरपुडा झाला. स्वामिनीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. स्वामिनीच्या साखरपुड्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. कोण आहे स्वामिनीचा नवरा? जाणून घ्या

स्वामिनीचा साखरपुडा, होणारा नवरा कोण?स्वामिनीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे वरुण नायर. वरुण आणि स्वानंदी  गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. वरुण हा प्रसिद्ध निर्माता आहे. मिरारी प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेचा तो संस्थापक आहे. वरुणने प्लॅनेट मराठीवरील 'बाबा' या सिनेमाची निर्मिती केली होती.  या सिनेमात जयवंत वाडकर आणि स्वामिनी या बाप-लेकीने काम केलं होतं. 'वरुण हा मल्याळी असून तो स्वामी भक्त आहे', अशा शब्दात जयवंत वाडकरांच्या पत्नीने जावयाचं कौतुक केलं. या खास प्रसंगी जयवंत वाडकर खूप आनंदी  दिसत होते.

वरुणने गुडघ्यावर बसून स्वामिनीच्या बोटात अंगठी घातली. याशिवाय दोघांनी उत्साहात कॅमेरासमोर पोज दिली आणि फोटो काढले. स्वामिनीच्या साखरपुड्याला गौरव मोरे, अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. स्वामिनी सुद्धा अभिनेत्री असून तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. स्वामिनीच्या लग्नाची तारीख अजून निश्चित नाही. पण पुढच्या काही दिवसात ती लग्न करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actor Jaywant Wadkar's daughter Swamini engaged; groom details revealed.

Web Summary : Jaywant Wadkar's daughter, Swamini, is engaged to Varun Nair, a producer. Celebrities attended the grand ceremony. Varun founded Mirari Production, producing the film 'Baba' starring Jaywant and Swamini. The couple has been in a relationship for months. Wedding date is yet to be announced.
टॅग्स :जयवंत वाडकरअभिनय बेर्डेस्वानंदी बेर्डेलग्नमराठी चित्रपट