Join us

साउथ सुपरस्टार धनुष नवीन अवतारात; तिरुपती बालाजी मंदिरात दान केले केस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 19:20 IST

Dhanush Visit Tirupati Temple: धनुषचे तिरुपती बालाजी मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Dhanush Visit Tirupati Temple: साऊथ सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या आगामी 'कॅप्टन मिलर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला असून, चाहत्यांची उत्सुकताही वाढली आहे. या चित्रपटातील धनुषचा केस आणि दाढी वाढवलेला लूक चांगलाच व्हायरल झाला होता. पण, आता धनुषने आपला लूक पूर्णपणे बदलला आहे. धनुषने आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरा जाऊन दर्शन घेतले आणि यावेळी केसही दान केले आहेत. 

धनुष गेल्या काही महिन्यांपासून आपले दाढी आणि केस वाढवत होता. त्याचा हा लूक चाहत्यांच्याही प्रचंड पसंतीस उतरला. आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटाच्या टीझरमध्येही तो याच लूकमध्ये दिसला. त्यामुळे धनुष हाच लूक पुढील चित्रपटात ठेवेल, असे चाहत्यांना वाटले होते. पण, आता धनुषने तिरुपती बालाजी मंदिरात केस दान केले आहेत. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी धनुषसोबत त्याची दोन्ही मुले यात्रा आणि लिंगा दिसत आहेत. दोन्ही मुलांसह धनुषचे आई-वडीलही उपस्थित होते.

कॅप्टन मिलर कधी येणार?

धनुषचा आगामी चित्रपट कॅप्टन मिलरचा फर्स्ट लूक 30 जून रोजी शेअर करण्यात आला, ज्यामध्ये अनेक जवानांचे मृतदेह शेतात पडलेलेत आणि धनुष तिथे उभा असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात धनुष एका सैनिकाच्या भूमिकेत आहे. फर्स्ट लूकमध्ये धनुष लांब केस आणि लांब दाढीमध्ये दिसत आहे. धनुषचा हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. तारीख अद्याप समोर आली नाही. 

तेरे इश्क में कॅप्टन मिलर व्यतिरिक्त धनुषने आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. 'रांझना'चे दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या आगामी तेरे इश्क में चित्रपटात तो दिसणार आहे. ही एक लव्हस्टोरी असेल. या चित्रपटाचे ट्रेलर आल्यानंतर धनुषचे चाहते खूप उत्साहित आहेत.

टॅग्स :धनुषतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटTollywood