Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हा' प्रसिद्ध अभिनेता आहे निशिगंधा वाड यांचा पती; 'श्रीकृष्ण' मालिकेत साकारली होती महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 12:43 IST

Nishigandha wad: निशिगंधा वाड यांच्या पतीने 'तुजवीण सख्या रे', 'लेक लाडकी या घरची' यांसारख्या गाजलेल्या मालिकेत काम केलं आहे.

मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड (Nishigandha wad). आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलं. त्यामुळे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. काळाच्या ओघामध्ये त्यांनी सिनेसृष्टीपासून थोडी फारकत घेतली आहे. मात्र, त्यांच्याविषयीच्या रंगणाऱ्या चर्चा अजूनही कायम आहेत. यात सध्या सोशल मीडियावर त्यांच्या पतीची चर्चा रंगली आहे. निशिगंधा वाड यांचे पती प्रसिद्ध अभिनेता असून त्याने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.

निशिगंधा वाड या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्याप्रमाणेच त्यांचा नवरादेखील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांनी लेक लाडकी या घरची', 'तुजवीण सख्या रे' या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, ओघाओघाने ते या क्षेत्रात आले. नाही तर त्यांना क्रिकेटर व्हायचं होतं.

निशिगंधा वाड यांनी भंगारवाल्याला दिले होते हिऱ्याचे कानातले; कारण समजल्यावर घरचेही झाले थक्क

निशिगंधा वाड (Nishigandha wad) यांनी अभिनेता दिपक देऊलकर (deepak dewoolkar) यांच्यासोबत लग्न केलं आहे. दीपक यांनी १९९३ साली प्रदर्शित झालेल्या रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण या मालिकेत दिपक यांनी बलराम ही भूमिका साकारली होती.

दिपक यांना खरंतर क्रिकेटपटू व्हायचं होतं. ते लोकप्रिय फिरकी गोलंदाज होते. मुंबई अंडर-19 च्या क्रिकेट संघातही ते खेळायचे. परंतु, एका अपघातामुळे त्यांच्या क्रिकेटची कारकिर्द संपुष्टात आली. रिपोर्टनुसार, एकदा क्रिकेट खेळत असताना त्यांच्या हाताला जोरात बॉल लागला. ज्यामुळे त्यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना संघातून वगळण्यात आलं. त्यामुळे त्यांनी क्रिकेटला रामराम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा सिनेसृष्टीकडे वळवला. दरम्यान, दिपक देउलकर सध्या यांचा हिंदी कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, ते मराठी कलाविश्वात सक्रीय आहेत. 

टॅग्स :निशिगंधा वाडसिनेमामराठी अभिनेता