Join us  

लोकप्रिय अभिनेत्याच्या बाथरुममध्ये आढळला साप, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 2:32 PM

अभिनेत्याच्या बाथरुममध्ये साप आढळून आला आहे.

वीर दासला आज कोण ओळखतं नाही. अभिनेता म्हणून चित्रपटातील कारकिर्दीव्यतिरिक्त वीर दास हा स्टँडअप कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे. वीर दास हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतेच त्यानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या बाथरुममध्ये साप आढळून आला आहे. त्याची झलक त्याने चाहत्यांनाही दाखवली आहे.

वीर दासनं X अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये बाथरुममध्ये एक साप फिरताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहलं, 'मी रात्री वॉशरूममध्ये गेलो होतो, तेव्हा अचानक एक साप थेट फ्लश हँडलजवळच्या पाण्याच्या टाकीवर पडला. त्या सापाला पाहून मी इतका घाबरलो की आता मी पुन्हा हे टॉयलेट अजिबात वापरणार नाहीये'. अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 वीर दासच्या या व्हिडीओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं लिहिलं, 'म्हणूनच मला अशा इको-रिसॉर्ट्सचा तिरस्कार वाटतो'. तर  दुसऱ्यानं लिहिलं, 'हो कधीही कोणत्याही इको-रिसॉर्टमध्ये जाणार नाही'. वीर दास हा उत्कृष्ट अभिनेता आहे. आत्तापर्यंत त्याने 'नमस्ते लंडन', 'बदमाश कंपनी', 'गो गोवा गॉन', 'शादी के साइड इफेक्ट्स', 'लव्ह आज कल', अशा अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो शेवटचा 'द बबल'मध्ये दिसला होता. जो 2022 मध्ये रिलीज झाला होता. 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसापसोशल व्हायरल