सुपरस्टार धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट म्हणजेच 'इक्कीस'बद्दल एक खास माहिती समोर आली आहे. या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या दिवशी सनी-बॉबी आणि संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. अशातच समोर आलेल्या माहितीनुसार 'इक्कीस' सिनेमासाठी बॉबी देओलने एक खास गोष्ट केली आहे. जी वाचून तुम्हालाही आनंद होईल. जाणून घ्या सविस्तर
'इक्कीस' सिनेमात धर्मेंद्र यांच्या तरुणपणीची भूमिकाही पाहायला मिळणार आहे. धर्मेंद्र यांची ही भूमिका अधिक खरी आणि जिवंत वाटावी म्हणून निर्मात्यांनी त्यांचा मुलगा बॉबी देओलची मदत घेतली आहे. बॉबीने आपल्या वडिलांच्या तरुण भूमिकेतील काही संवादांचे डबिंग केले असून, त्याच्या आवाजामुळे धर्मेंद्र यांच्या पात्राला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे.
या क्रिएटिव्ह निर्णयामुळे बॉबी देओलचाही सिनेमात एन्ट्री झाली आहे. बॉबीच्या आवाजामुळे धर्मेंद्र यांच्या तरुणपणीच्या भूमिकेत आणखी रंगत निर्माण झाली आहे. यामुळे कथेतील भावनिक प्रसंग प्रेक्षकांच्या अधिक हृदयाला भिडतील यात शंका नाही. बॉबी देओलने केलेल्या या खास सहकार्याबद्दल चित्रपट निर्मात्यांनी त्याचे विशेष आभार मानले आहेत.
दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि निर्माते दिनेश विजन यांचा हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील शहीद आणि सर्वात तरुण परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या शौर्यावर आधारित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत असून, जयदीप अहलावत आणि सिमर भाटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'इक्कीस' हा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होत आहे.
Web Summary : Bobby Deol dubbed for young Dharmendra in ' इक्कीस ', adding depth to the character. The film, based on the 1971 war hero Arun Khetarpal, stars Agastya Nanda and releases January 1, 2026.
Web Summary : बॉबी देओल ने 'इक्कीस' में युवा धर्मेंद्र के लिए डबिंग की, जिससे किरदार में गहराई आई। 1971 के युद्ध नायक अरुण खेत्रपाल पर आधारित फिल्म में अगस्त्य नंदा हैं और यह 1 जनवरी, 2026 को रिलीज होगी।