Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत अभिनेता आरोह वेलणकर म्हणाला, अर्जुन बाबाच तुझ्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 21:10 IST

आरोहने शेअर केला फोटोत सोशल मीडियावर काही तासातच व्हायरल झाला आहे.

अभिनेता आरोह वेलणकर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. आपले फोटो फोटो आणि व्हिडीओ तो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. आरोहने नुकताच एका ब्लॅक अँड फोटो शेअर केला आहे जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोत आरोहने आपल्या मुलाला हातात घेतले आहे. अर्जुन बाबाच तुझ्यावर खूप प्रेम आहे असं कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. आरोहच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनी कमेंट्स केल्या आहेत. मार्च महिन्यात आरोहची पत्नी अंकिताने बाळाला जन्म दिला होता. अंकिता आणि त्याच्या चिमुकल्या बाळाची तब्येत ठीक असल्याचे त्यावेळी आरोहने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. त्यानंतर आज पहिल्यांदाच त्याने आपल्या चिमुकल्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. 

आरोहच्या पत्नीचे नाव अंकिता शिंगवी असून महाबळेश्वरमध्ये आरोह आणि अंकिताचे डेस्टिनेशन वेडिंग पार पडले होते. नेहमीच सोशल मीडियावर आरोह आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळते. या दोघांच्या फोटोंना चाहतेदेखील तुफान पंसती देत असतात. अंकिताही पुण्याची असून तिचा चित्रपटसृष्टी आणि अभिनयाशी संबंध नाही.

बिग बॉस मराठीच्या घरात आरोह झळकला होता. तसेच त्याने रेगे या चित्रपटातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर घंटा या चित्रपटातही तो झळकला होता. लाडाची मी लेक गं ही त्याची मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आरोह अनेक सामाजिक संस्थांबरोबर संलग्न आहे. 'आय व्होट' सारख्या वेगवेगळ्या जनजागृती मोहिमांमध्ये तो सहभागी झाला होता. दिव्यांगांसाठीही तो काम करतो.

टॅग्स :आरोह वेलणकर